Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Pune : पुणेकरांनो सावध राहा! … पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर ‘हाऊसफुल्ल’ … एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९ एप्रिल) : राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची  संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या संकटात आता आणखीनच भर पडली आहे. कारण, सामान्य लोकांना कोरोना उपचार घ्यायचे झाल्यास आशेचे केंद्र असलेले जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

Google Ad

पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही

पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!