Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवेदनाची घेतली तातडीने दखल … पिंपरी चिंचवड आयुक्तांनी शहरातील तीन रुग्णालयांना बजावली नोटीस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . ८ एप्रिल २०२१) : रेमडेसिवीर इंजेक्शन रूग्णालयाबाहेर ऍडमिट असलेल्या रुग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील तीन रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे .

या तीन रूग्णालयांमध्ये आदित्य बिर्ला हॉस्पीटल , लोकमान्य हॉस्पीटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ . डी . वाय . पाटील हॉस्पीटलचे अधिष्ठीता तथा वैद्यकिय अधिक्षक यांचा समावेश आहे .

Google Ad

सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीच्या अशा प्रथेमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . याची सखोल चौकशी करुन पुढील ४८ तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा असे नोटीसीत नमुद केले आहे . साथरोग अधिनियम , १८ ९ ७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , २००५ अंतर्गत आपणा विरूध्द आवश्यक कारवाई का करू नये असे देखील नोटीसीत म्हटले आहे .

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याने ही अतिशय गंभीर बाब असून, त्याची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी. त्यावर तातडीने उपाययोजना करून पिंपरी-चिंचवडसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी कालच दि. ०७ एप्रिल २९२१ राजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

168 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!