Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन हत्या केल्यानंतर दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला. 30 वर्षीय तरुणाच्या हत्येमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित या तरुणाची हत्या करण्यात आली. सुदर्शन हा पुण्यातील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता. सुतारवाडी भागातील शिवनगर परिसरात सुदर्शन पंडित राहत होता. तो मूळ जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जानेफळचा (पंडित) रहिवासी होता.

Google Ad

धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन सुदर्शनची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल समोर आली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला. त्याचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला. सुदर्शनच्या हत्येबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!