Google Ad
Editor Choice Maharashtra

सेंच्युरी इंका कामगार प्रतिनिधी निवडणूकीमध्ये ‘जय श्री गणेश कामगार विकास पॅनल’ चे निर्विवाद बहुमत!

महाराष्ट्र 14 न्यूज : सेंचुरी एंका लि.भोसरी या कंपनीमधे भारतीय मजदूर संघ सलग्न , पुणे जिल्हा कामगार संघाची युनिअन असुन दि २६ फेब्रुवारी २०२१ रोजी ११ कामगार प्रतिनिधि निवडण्यासाठी निवडणुक पार पडली, अगदी शांततामय वातावरणात ही निवडणूक पार पडली. यामध्ये जय श्री गणेश कामगार विकास पॅनलचे ११ उमेदवार , स्वामी समर्थ विकास पॅनलचे ११ , संघर्ष विकास पॅनलचे ५ व अपक्ष १ असे एकुण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत जय श्री गणेश कामगार विकास पॅनलला कामगारांनी भरगोस असा कौल दिला असुन कर्मचाऱ्यांमधून विशाल साळवी , श्री महेश डोंगरे , रविंद्र घाडगे , विलास सुपेकर , सुरेश काशिद , रमेश वाघेरे , गोरक्षनाथ कर्डिले असे एकुण ७ आणि स्वामी समर्थ कामगार पॅनलचे संतोष शेळके , राजु चित्ते , मनोज ओस्तवाल , बाळासाहेब पठारे असे एकुण ४ प्रतिनिधि निवडणुकीत विजयी झाले. निवडनुक अधिकारी म्हनुण आण्णा महाजन व अर्जुन चव्हाण यांनी काम पाहिले.

Google Ad

यावेळी कामगारांसाठी आरोग्य विमा पॅालीसी , कंपनीमधे नवीन गुंतवणुक आणण्यासाठी भर जेणेकरून कंपनीचे आयुष्य वाढेल व सर्वांचा रोजगार कायम राहिल. कामगारांचे आरोग्य , कामगारांची आर्थिक परिस्थिती , कामगारांची सुरक्षा , कामगारांचे अस्तित्व असा चार सुत्री कार्यक्रम राबविणार तसेच कामगार हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आश्वासन जय श्री गणेश कामगार विकास पॅनलने दिले. सेंचुरी एंका कंपनी मधे नायलॅान यार्न व नायलॅान इंडस्ट्रीयल यार्न उत्पादन होत आहे. कोरोना काळानंतर कंपनीचे उत्पादन सुरळीतपणे चालु असुन बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!