Google Ad
Editor Choice Pune

Pune : चहा पिताना एकमेकांकडे पाहण्याच्या रागातून तिघांनी केले कोयत्याने वार!

महाराष्ट्र 14 न्यूज : चहा पिताना एकमेकांकडे पाहण्याच्या रागातून तीन जणांनी तरुणावर कोयत्याने वार केले . यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला . वडगाव बुद्रुक परिसरात हा प्रकार घडला . या प्रकरणी शुभम ढमाळ ( वय २५ , रा . वडगाव बुद्रुक ) यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे . त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास शुभम व त्यांचा मित्र दत्ता खारगे चहा पिण्यासाठी कुदळे पाटील कमानीसमोरील टपरीवर गेले होते . त्या वेळी तेथे चहा पित असलेल्या तिघांकडे शुभमने पाहिले . त्याचा राग आल्यामुळे त्यांनी शुभम आणि दत्ताला शिवीगाळ यातून झालेल्या भांडणातून या तिघांनी शुभमवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के . एस . तनपुरे करीत आहेत .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!