Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : तरुणीला ब्लॅकमेलिंग करून धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दोन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील उतम नगर भागात आहे . या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सदर तरुणाला अटक केली असून, आकाश माने ( वय २३ , रा . किरकटवाडी ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे . या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने उत्तमनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी आकाश याने तक्रारदार तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले . त्या वेळी त्याने तिचे फोटो व व्हिडिओ काढले . त्यानंतर तो तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला . पैसे न दिल्यास फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली . तरुणीने गेल्या वर्षभरात त्याला दोन लाख रुपये दिले . तरीही त्याची मागणी थांबली नाही . तो तिला मारहाणही करत होता . सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली . या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली आहे .

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!