Google Ad
Editor Choice Maharashtra

पुणे पदवीधर निवडणूक : संभाजी ब्रिगेडच्या संग्राम देशमुखांचं भाजपच्या संग्राम देशमुखांना आव्हान

महाराष्ट्र 24 न्यूज : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक ऐन रंगात आली आहे. पदवीधरमधून तीन आणि शिक्षक मतदारसंघातून दोन जागा अशा एकूण 5 मतदारसंघांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघात नगरच्या संग्राम देशमुखांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. राजकारण फक्त राजकारण्यांच्या मुलाबाळांनी करायचे आणि आम्ही केवळ सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल करत संग्राम देशमुख यांनी आपली दावेदारी केली आहे.

Google Ad

कोण आहेत संग्राम देशमुख?
संग्राम देशमुख हे मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या गावचे. त्यांनी बीएससी कॉम्प्युटर सायन्स ही पदवी घेतली आहे. कॉलेज चालू असताना अहमदनगरमध्ये एका सायबर कॅफेवर पार्ट टाईम काम केले. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पुण्यात टेक महिंद्रामध्ये BPO मध्ये वर्षभर नोकरी केली. त्यानंतर एका खासगी कन्स्ट्रक्शन साईटवर नोकरी केली. नोकरीनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कच्या फेज 2 मध्ये भागीदारीत हॉटेल व्यवसाय केला.
त्यानंतर घरच्या अडचणीमुळे गावाकडे जावे लागले. गावाकडे गेल्यानंतर नोकरी आणि व्यवसायाच्या संधी शोधण्याऐवजी आपल्या घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात शेती करण्याचे प्रयोग सुरु केले. ऊस, तूर, कांदा, आंबा बाग यासारख्या नगदी पिके आणि फळबागा लागवड करुन गावामध्ये एक उच्चशिक्षित आणि यशस्वी शेतकरी अशी स्वतःची ओळख निर्माण केली.

 

कॉलेज जीवनापासूनच संग्रामच्या मनात वाचनाची आवड होती. पुण्यात आल्यानंतर ते संभाजी ब्रिगेडशी जोडले गेले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुरोगामी विचारांचे कार्यक्रम, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, शिवसन्मान जागर परिषद अशा सार्वजनिक स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रागतिक विचारांचे लोक त्याच्याशी जोडले गेले.

राजकारण फक्त राजकारण्यांच्या मुलाबाळांनी करायचे आणि आम्ही केवळ सतरंज्या उचलायच्या का ? हा सवाल विचारणारी ही उमेदवारी आहे. पदवीधरची निवडणूक म्हणजे राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्याची निवडणूक नाही, तर पदवीधरांना लोकशाहीने दिलेला विशेषाधिकार वापरून आपला योग्य प्रतिनिधी (नेता नव्हे) सभागृहात पाठवण्याची ही निवडणूक आहे, असं संग्राम देशमुख यांचं म्हणणं आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ पुणे पदवीधर मतदरासंघातून प्रमुख पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केलीय. मनसेकडून रुपाली पाटील, जनता दलाकडून शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाकडून डॉ. अमोल पवार अर्ज दाखल करणार आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर

अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर

मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 )

मतमोजणी : 3 डिसेंबर

निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर

Google Ad

About the author

Maharashtra14 News

281 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!