Google Ad
Editor Choice Maharashtra

पुणे पदवीधर निवडणूक ; प्रत्येक केंद्रावर असणार ‘ या ‘ विभागाचे अधिकारी … काय घेतली आहे, निवडणूक यंत्रणेने खबरदारी!

महाराष्ट्र 14 न्यूज : यंदाच्या पदवीधर निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. दरम्यान पक्षांच्या प्रचार मोहीमा देखील जोरदार राबवल्या जात आहेत. यंदाच्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी, विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. मात्र पुणे येथे २०२० साली होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतली असल्याचे पाहायला पाहायला मिळत आहे.

Google Ad

🔴काय घेतली आहे निवडणूक यंत्रणेने खबरदारी

दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. आतापर्यंत झालेल्या कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहेत. तसंच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक दोन दिवस आधी मतदान पॉझिटिव्ह आला तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

🔴१ डिसेंबरला राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढत असताना दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच १ डिसेंबर रोजी राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याने मतदारांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेने देखील आपला उमेदवार उभा केल्याने ही लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

🔴हे आहेत पुणे पदवीधर

मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
संग्राम देशमुख (भाजप)
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
शरद पाटील ( जनता दल )
रुपाली पाटील ( मनसे )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!