Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रचारात आता रंगत येऊ लागली आहे, राष्ट्रवादीच्या परवा झालेल्या अजित पवार यांच्या मेळाव्यानंतर आज (ता.२५) भाजपचा पदाधिकारी,कार्यकर्ता मेळावा झाला, असून त्यात माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

Google Ad

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले
” देशातल्या लोकांना कर्मयोगी मानसं अडतात. बोलघेवडी लोकं अवडत नाहीत. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने कोनाला मदत केली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, महिला अशा कोणाला सुध्दा एका फुटक्या कवडीची मदत केली नाही. कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ वीजबिल दिली, वीजबिलात सवलत देतो बोलले, आणि शेवटी वीजबिल भरावं लागेल, माफी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले, त्यांनी विजबिलाचा शॉक दिला आपण त्यांना मतांचा शॉक देऊ असेही फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्या एक वर्षात सरकारनं कोणतंही आश्वासन पाळलं नाही. वर्षभरात चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र बंद पाडला. एकही नवं काम राज्याला पुढं नेणारं सरकारने केलं नाही.

अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारार्थ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार निरंजन डावखरे, पुणे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे, बाबू नायर, उपमहापौर केशव घोळवे, उमा खापरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अमित गोरखे, माजी महापौर राहूल जाधव, संघटक सरचिटणीस अमोल थोरात नगरसेवक, नगरसेविका, मंडल पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!