Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : वाहनचालकांना लुटमारकरण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस … कात्रज जुन्या बोगद्या जवळ धारदार हत्यारासह अटक !

महाराष्ट्र 14 न्यूज : भारती विदयापीठ पोलीस ठाणे हददीत पेट्रोलीग करीत असणारे तपास पथकाचे पोलीस उप – निरीक्षक महेंद्र पाटील हे तपास पथकातील कर्मचारी यांचेसह पोलीस ठाणे हददीत पेट्रोलींग करीत असताना रात्री ८.०० वा सुमारास तपास पथकातील पोलीस कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , चार ते पाच इसम हे पुणे सातारा रोड जुने कात्रज बोगदयाच्या अलीकडे अंधारात थांबलेले असुन त्यांचेकडे धारदार हत्यारे असुन ते रोडने जाणारे येणारे इसमांना लुटण्याच्या तयारीत आहेत .

अशी खात्रीशीर बातमी मिळाले नंतर पोलीस उप – निरीक्षक महेंद्र पाटील यांनी सदरची माहीती विष्णु ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांना कळविली असता त्यांनी जास्तीत जास्त पोलीस स्टाफ बरोबर घेवुन जावुन ताबडतोब कारवाई करण्या बाबत आदेश दिले. या आदेशाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप – निरीक्षक महेंद्र पाटील यांनी तपास पथकातील कर्मचारी यांचे दोन ग्रुप तयार करुन पुणे सातारा रोड जुने कात्रज बोगदयाच्या जवळ आड बाजुस अंधारात सापळा लावुन इसम नामे सुरेश बळीराम दयाळु वय .२९ वर्षे रा.स्वामी समर्थनगर गल्ली नं ६ घरनं ७ अप्परडेपो जवळ बिबवेवाडी पुणे ,

Google Ad

चाँद फकरुददीन याकुब शेख वय .२२ वर्षे रा.बी / १६ ९ खोलीनं १२ व्हिआयटी कॉलेजजवळ बिबवेवाडी पुणे तसेच कृष्णा विक्रम ढावरे वय .२२ वर्षे श्रेयसनगर अप्पर बिबवेवाडी, असीफ अल्लाबक्ष शेख वय .२१ वर्षे रा.खामकर वस्ती चर्च जवळ अप्पर इंदीरानगर, अशिष नवनाथ डाकले वय .२५ वर्षे रा.केदारेश्वर वस्ती गोकुळनगर टाकीजवळ कोंढवा यांना ताब्यात घेतले असता त्यांचे कब्जा मध्ये एक धारदार लोखंडी कोयता व एक धारदार लोखंडी चॉपर व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ६६,४०० / -चा माल मिळुन आलेला आहे.सदर आरोपीकडे विचारपुस करता व त्यांचे बाबत खात्री केली असता त्यांच्यावर जबरी चोरी , दरोडा , खुन खुनाचा प्रयत्न , चोरी यांसारखे गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली ,

सदर आरोपी हे कात्रज बोगदयाजवळ रस्त्याने जाणारे येणारे वाहन चालंकाना कोयत्याचा धाक दाखवुन लुटमार करणार असल्याचे सांगीतल्याने त्यांचे विरूध्द भारती विदयापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेद्र पाटील हे करत आहेत . यातील अटक आरोपी नामे सुरेश बळीराम दयाळु हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे वर खुन खुनाचा प्रयत्न , जबरीचोरी , असे गुन्हे दाखल असून आरोपी नामे चाँद फकरुददीन याकुब शेख हा सुध्दा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर दरोड्याचा प्रयत्न , जबरी चोरी , वाहन चोरी व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल असून तो सध्या पुणे शहर व जिल्हयातून दोन वर्षाकरीता तडीपार केलेले आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

20 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!