Google Ad
Editor Choice Maharashtra

भोसरी गावठाण येथे पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे … शाळा इमारत व बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन!

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रगतीशील देश घडविण्यासाठी शैक्षणिक विकास महत्वपूर्ण आहे . विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शहरात उत्कृष्ट शाळांची निर्मिती आवश्यक असून आपल्या महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त शाळांच्या निर्मितीचा सातत्याने प्रयत्न राहील असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले .

भोसरी येथील प्रभाग क्र . ७ मधील आरक्षण क्र . ४३० मध्ये ८ कोटी ३० लाख रुपये खर्च करून प्राथमिक शाळा इमारत बांधण्यात येणार आहे तसेच भोसरी येथील करसंकलन इमारती शेजारच्या जागेमध्ये ४ कोटी ६२ लाख रुपये खर्च करून बहुउद्देशीय हॉल बांधण्यात येणार आहे . या कामांचे भूमिपूजन महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले .

Google Ad

त्यावेळी महापौर ढोरे बोलत होत्या . या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , नगरसदस्य नितीन लांडगे , नगरसदस्या सोनाली गव्हाणे , माजी नगरसदस्या शुभांगी लोंढे , विजय लांडे , कार्यकारी अभियंता संजय घुबे , उपअभियंता देवेद्र बोरावके , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गव्हाणे , सम्राट फुगे , मयुरेश लोंढे , सनी पाखरे , महेंद्र गायकवाड , हरी शेळके , शंकर रसाळ , चंद्रकांत रसाळ , प्रशांत वैरागर , मयर बोरगे , स्वप्निल रिठे , प्रतिक लोंढे , राहुल शेंडगे , जयश्री खरमाटे , रोहीनी मांढरे , गणेश वाळुजकर , भिष्मा गायकवाड , नितीन कुटे , सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते .

भोसरी येथील प्रभाग क्र . ७ मध्ये करसंकलन इमारतीच्या शेजारी महापालिकेच्या ताब्यातील जागेत बहुउद्देशीय हॉल बांधण्यात येणार आहे . तळमजला अधिक तीन मजले अशा स्वरूपात ही इमारत उभारली जाईल . प्रत्येक मजल्यावर सभागृह हॉलचे नियोजन करण्यात आले आहे . भोसरी येथील प्रभाग क्र . ७ मधील आरक्षण क्र . ४३० मध्ये तळमजला अधिक तीन मजले अशा स्वरूपात प्राथमिक शाळेची इमारत बांधली जाणार आहे .

इमारती परिसरात खेळाचे मैदान देखील असणार आहे . इमारतीमध्ये प्रयोगशाळा , संगणक कक्ष , शिक्षक कक्ष , कार्यालय , वर्ग खोल्या इत्यादी ३४ खोल्या असतील . शिवाय भव्य सभागृहाची व्यवस्था देखील करण्यात आली असून प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहीती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!