Google Ad
Editor Choice Pune

Pune : रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईलफोन चोरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-१ पुणे यांनी केले जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : दि .१० जानेवारी २०२० रोजी निलेश अराळकर हे पाठीवर सॅक घेऊन दगडुशेठ ते शनिवार वाडा दरम्यान चालत असताना कोणतरी अज्ञात इसमाने त्यांच्या सॅकच्या कप्याची चेनउघडुन ओपो कंपनीचा मोबाईल फोन चोरुन नेला त्याबाबत विश्रामबाग पोस्टे गुरनं १६/२०२० भादविक ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . दि . २० / ० ९ / २०२० रोजी युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी वरील गुन्ह्याचा समांतर तपास करित असताना , पोलीस हवालदार योगेश जगताप यांनी सदर गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोबईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करुन सदर मोबाईल धानोरी येथील जयदिप ठाकुर नावाच्या इसमाचे ताब्यात असलेची माहिती प्राप्त केली .

सदर जयदिप ठाकुर या इसमाचा धानोरी भागात शोध घेत असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार व मल्लिकार्जुन स्वामी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , जयदिप ठाकुर हा विश्रांतवाडी ते लोहगाव मार्गावर रिक्षा चालवित असुन तो नेपाळी आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवुन परवानगीने युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव जयदीप रामछबीले ठाकुर , वय -२७ वर्षे , धंदा- रिक्षा चालक , रा.धानोरी गाव , १० वृंदावन सोसायटीचे समोर , पुणे असे असल्याचे सांगीतले.

Google Ad

त्यास विश्वासात घेवुन गुन्हयाचे अनुशंगाने तपास करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशात ओपो कंपनीचा ८,००० / – रू किचा मोबाईल फोन मिळुन आला . त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करता तो काहीएक समाधान कारक माहिती सांगत नसुन उडवाउडवीचे उत्तर देत आहे त्यावरुन सदरचा मोबाईल फोन त्याने चोरुन आणला असल्याची खात्री झाल्याने सदरचा मोबाईल फोन गुन्ह्याचे पुरावे कामी पंचनामा करुन पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे .

विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणुन सदर आरोपीस पुढील कारवाई कामी विश्रामबाग पोलीस स्टेशन , पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , संभाजी कदम , यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले , पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे , पोलीस कर्मचारी योगेश जगताप , अमोल पवार , वैभव स्वामी , इम्रान शेख , बाबा चव्हाण यांनी केली आहे

.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

122 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!