Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना अपडेट्स : पिंपरी चिंचवड शहरात ७८४ पॉझिटीव्ह रुग्ण … तर आज कोरोनामुक्त रुग्णांचा उच्यांक!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरूवार ( दि. २४ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ७८४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज १५५९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील १६ मृत झालेले रुग्ण हे थेरगाव (स्त्री ५९ वर्षे), कासारवाडी (पुरुष ७५ वर्षे), मोशी (पुरुष ६० वर्षे), पिंपळे सौदागर ( पुरुष ६० वर्षे), ‍पिंपरी (पुरुष ४५ वर्षे), निगडी प्राधिकरण (पुरुष ५४ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), चिंचवड (पुरुष ६५ वर्षे), भोसरी (पुरुष ६३ वर्षे, पुरुष ५० वर्षे), काळेवाडी (स्त्री ६५ वर्षे, स्त्री ६० वर्षे, पुरुष ७० वर्षे), च-होली (पुरुष ७१ वर्षे ), दिघी (पुरुष ६८ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत १४ झालेला रुग्ण हे वडगांव शेरी (स्त्री ५१ वर्षे), हडपसर (पुरुष ६४ वर्षे), धनकवडी (स्त्री ४५ वर्षे), विठ्ठलवाडी (पुरुष ४५ वर्षे), जुन्नर (पुरुष ७० वर्षे,पुरुष ४८ वर्षे), वारजे (स्त्री वर्षे),पाषण (स्त्री ६५ वर्षे), खेडशिवापूर(पुरुष ५४ वर्षे), करमाळा (पुरुष ८४ वर्षे),देहूरोड (पुरुष ५२ वर्षे), आळंदी (पुरुष ३४ वर्षे) खंडाळा (पुरुष ७७ वर्षे) देहूगांव (पुरुष ६६ वर्षे) येथील रहिवासी आहे.

पाऊस असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!