Google Ad
Editor Choice Pune

Pune : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस भेटीचा योगायोग … नववर्षाच्या पहिल्याच दिवशी येणार एकत्र

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चा १ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत.

तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी आमदार उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पहाटेच्या शपथविधी नंतर अजितदादा आणि फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. दरम्यान, कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सभागृहातील उपस्थिती मर्यादित ठेवण्यात आली असून, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या लॉनवर करण्यात येणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Google Ad

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह सर्व गटनेते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे काम सन २०१४ मध्ये सुरू झाले. अनेक अडचणींवर मात करीत व शासनाच्या २२ विभागांच्या मान्यतेनंतर ५८३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आजमितीला पूर्ण झाला आहे. २०० दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी या प्रकल्पामुळे शहराच्या पूर्व भागातील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, वडगावशेरी या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहराला एक नवीन जलस्त्रोत जोडला गेला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

91 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!