Google Ad
Editor Choice Entertainment

Delhi : पंतप्रधान मोदींनी मराठीमधून दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा … म्हणाले , ” हा शुभ प्रसंग . “

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१०सप्टेंबर) : राज्यासह देशभरात आज मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत करण्यात येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरीही गणेशभक्तांच्या मनातला उत्साह मोठा आहे. पुढचे १० दिवस हा उत्साह असाच कायम राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Google Ad

“आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”,

असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच देशभरात विविध ठिकाणी गणेशभक्तांकडून मोठ्या उत्साहात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, बोरिवली, विरार यासारख्या मुंबईच्या लगतच्या उपगरांमध्ये सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वांचीच लगबग दिसून आली.

देशभरातील गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे करोनाचा धोका देखील कायम आहे. राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे.

वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात देशाला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे. उत्सव साजरा करण्यासोबतच सर्व नियमाचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. गंभीर स्थिती टाळण्यासाठी प्रत्येकालाच जबाबदारीचं भान असणं महत्त्वाचं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

52 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement