Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज कोरोनामुक्त रुग्णांचा उच्चांक … तर पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ सुरूच!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.७ ऑगस्ट २०२० ) रोजी ९६९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९६० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज ११२१ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले रुग्ण विकासनगर रहाटणी (स्त्री ६५ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६० वर्षे), मोरवाडी (पुरुष ६२ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष ५२ वर्षे), थेरगाव (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ४९ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ६५ वर्षे), मोशी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ७४ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६४ वर्षे), दापोडी (स्त्री ७० वर्षे), रुपीनगर निगडी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ४५ वर्षे), दिघी (पुरुष ७० वर्षे), बिजलीनगर (स्त्री ६५ वर्षे), नेहरुनगर (पुरुष ७५ वर्षे), शिरुर (पुरुष ३६ वर्षे), नारायणगाव (पुरुष ८५ वर्षे), चाकण (पुरुष ४४ वर्षे, स्त्री ३५ वर्षे), येरवडा (पुरुष ७४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

86 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!