Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढली … आज पुन्हा शहरात कोरोनाचा विस्फोट

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०६ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि.०६ एप्रिल २०२१ ) रोजी २९३८ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २९०४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ३४ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १६७९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आज झालेल्या मृत्यूची संख्या म्हणजे १० पुरुष – चिंचवड (४७,७१ वर्ष) थेरगाव (वय ६५, ६७ वर्ष ) कासारवाडी (४५ वय), पिंपळे निलख ( वय ६८ वर्ष ), दापोडी ( वय ६१ वर्ष ), खराळवाडी ( वय ४५ वर्ष ), शाहुनगर ( ८१ वर्ष ), कास्पटेवस्ती (६५ वर्ष) ०५ महिला – चिंचवड (४० वर्ष), भोसरी (७३ वर्ष ), निगडी (६२ वय), काळेवाडी (५४ वर्ष), सांगवी (वय ७० वर्ष )

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरा बाहेरील क्षेत्रामध्ये मृत्यूची संख्या आज झाली आहे. ०२ पुरुष – घोरपडी ( वय ५६ वर्ष) ०१ महिला – येरवडा (५३ वर्ष) धायरी (५३ वर्ष)

टीप – मृत्यूची संख्या मागील माहितीनुसार आज देण्यात आली. मृत्यू २४ तासांत ०९ रुग्ण.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ४१६
ब – ४८७
क – २५९
ड – ५२३
इ – २४०
फ – ३९९
ग – ३८९
ह – १९१
एकुण – २९०४

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!