Google Ad
Uncategorized

हृदयद्रावक घटना : वाय सी एम रुग्णालयात काल जन्मलेल्या जुळ्या मुलींच्या आईचा आज कोरोनामुळे मृत्यू … मायेचं छत्र हरपलं!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे, त्यातच पिंपरी मधील महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या कोरोनाबाधित आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूती नंतर जुळ्या मुलींची कोरोनाची तपासणी करण्यात आली, सुदैवाने जुळ्या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.

३५ वर्षीय या महिलेच्या प्रसुतीची वेळ जवळ आली होती, त्यातच तिला ४ एप्रिलला त्रास होऊ लागला. तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करताना ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. त्यामुळे अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.

Google Ad

दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ एप्रिलला ऑपरेशन (सिझेरियन) करुन प्रसुती करण्यात आली आणि तिने जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. पण त्यानंतर आईची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका दिवसाच्या आतच आतच जुळ्या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!