Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी – चिंचवड शिवसेनेतील गटबाजीचा मंगळवारी उद्रेक … अखेर, महापालिकेतील शिवसेना गटनेते पदाचा ‘राहुल कलाटे’ यांचा राजीनामा

महाराष्ट्र 14 न्यूज : शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार राहुल कलाटे यांनी अखरे आज ( दि.१६, मंगळवारी ) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे . याबाबतची माहिती कलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी नगरसेवक अमित गावडे , नगरसेविका मिनल यादव , अश्विनी वाघमारे , विशाल यादव , विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते .

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत . यामध्ये राहुल कलाटे प्रभाग क्रमांक २५ वाकड , माळवाडी , पुनावळे , पंढारेवस्ती , भुजबळ , भूमकरवस्ती या प्रभागातून निवडून आले आहेत . महापालिकेवर प्रथमच निवडून आलेल्या कलाटे यांची शिवसेना गटनेतेपदी वर्णी लागली . याच काळात त्यांनी दोन वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद देखील भूषविले.

Google Ad

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी नविन आठ सदस्यांची निवड झाली आहे . शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते . परंतु , गटनेते राहुल कलाटे यांनी पक्षाचा आदेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिले . कलाटे यांनी पक्ष आदेशाचा भंग केला असल्याचा ठपका एका गटाने त्यांच्यावर ठेवला होता. यावर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना खुलासा मागण्यात आला होता.

पिंपरी – चिंचवड शिवसेनेतील गटबाजीचा मंगळवारी उद्रेक झाला आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला . स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीवरून झालेल्या राजकीय चढाओढमध्ये खासदार श्रीरंग बारणे गटाने कलाटे गटावर यशस्वी कुरघोडी केली आहे . राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून  निवडणूकही लढविली होती . त्यांना एक लाखाच्या पुढे मते मिळाली होती .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

22 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!