Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या विषय समिती सभापती पदासाठी आज अर्ज दाखल … भाजपच्या नगरसेविका ‘चंदा लोखंडे’ होणार महिला बालकल्याण च्या सभापती!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विषय समितींच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून आज ( सोमवार १९ ऑक्टोबर ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, यात विधी समिती स्विनल म्हेत्रे , महिला व बालकल्याण समिती चंदा लोखंडे , शहर सुधारणा समिती सोनाली गव्हाणे , क्रीडा , कला , साहित्य व सांस्कृतिक समिती उत्तम केंदळे , शिक्षण समिती मनिषा पवार यांचा समावेश आहे.

सभापती पदाची ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी ( दि .२३ ) रोजी होणार आहे . दरम्यान आज सोमवारी ( दि .१९ ) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत होती . यावेळी महापौर माई ढोरे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , नगरसेवक हर्षल ढोरे , मोरेश्वर शेडगे , बाळासाहेब ओव्हाळ , अंबरनाथ कांबळे , तूषार कामठे , नगरसेविका , माया बारणे , अनुराधा गोरखे , सविता खुळे आदी उपस्थित होते . नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने जवळजवळ ही निवड बिनविरोध झाल्याचे दिसत आहे. यात पाचही समित्या या सत्ताधारी भाजपकडे असणार आहेत, या पाच विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होणार आहे . महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विषय समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ . ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत .

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!