Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या कागदपत्र छाननीस मुदतवाढ … उपस्थित राहू न शकलेल्या लाभार्थ्यांना होणार फायदा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविणेत येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये निवड झालेले जे लाभार्थी कागदपत्र छाननीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत अशा रावेत प्रकल्पासाठीच्या लाभार्थ्यांना दि . ५ एप्रिल २०२१ ते ७ एप्रिल २०२१ पर्यत कागदपत्रे तपासणीकामी उपस्थित राहण्याचे नियोजन करणेत आले आहे , अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे , उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली .

Google Ad

तर रावेत प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी दि .२० एप्रिल २०२१ व दि .२२ एप्रिल २०२१ रोजी संधी देण्यात आली आहे . बो – हाडेवाडी प्रकल्पासाठी निवड झालेल्या व जे लाभार्थी पहिल्या टप्प्यात उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी दि . ८ एप्रिल २०२१.९ एप्रिल २०२१ व दि .१२ एप्रिल २०२१ रोजी तपासणी करण्याचे नियोजन करणेत आले आहे . तर बो – हाडेवाडी प्रकल्पातील निवड झालेल्या व तपासणीतील उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी लाभार्थ्यांनी २३ एप्रिल २०२१ व दि .२६ एप्रिल २०२१ रोजी उपस्थित रहावे .

च – होली प्रकल्पातील निवड झालेल्या परंतु कागदपत्रांच्या छाननीसाठी उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांना १५ एप्रिल २०२१ , १६ एप्रिल २०२१ व दि .१ ९ एप्रिल २०२१ रोजी कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित राहता येणार आहे . तर यापूर्वि कागदपत्रे तपासणी झालेल्या मात्र उर्वरीत कागदपत्रे सादर न केलेल्यांना दि . २७ एप्रिल २०२१ व दि .२८ एप्रिल २०२१ रोजी आपली कागदपत्रे सादर करणेसाठी मुदत देणेत आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली . यासाठी लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग , चिंचवड याठिकाणी आपली कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित रहावे , असे आवाहन करणेत येत आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!