Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चिखली, मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या ‘सिद्धीविनायक हाॅस्पीटलवर’ पिंपरी चिंचवड मनपाची पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज,२२ ॲागस्ट : चिखली मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या सिद्धीविनायक हाॅस्पीटलवर पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने आज केली.सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे ,आरोग्य निरीक्षक विजय दवाळे व वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवांई केली. चिखली येथील कुदळवाडी येथे असणाऱ्या कचराकुंडीत दवाखान्यात वापरण्यात आलेले इंजेक्शन व वैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले.

त्यामध्ये असणारी कागदपत्रांच्या आधारे हा वैद्यकीय कचरा सिद्धीविनायक रूग्णालयाचा असल्याचे तपासणीत आढळून आले.आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डाॅ सुनिता साळवी यांनी प्रत्यक्ष कचरा कुंडीत टाकण्यात आलेल्या कचऱ्याची पाहणी केली व त्यानंतर मोशी रस्त्यावरील या रूग्णालयात जावून तपासणी केली असतां त्यांच्याकडे महानगरपालिकेकडील वैद्यकिय कचऱ्याची परवानगी नसल्याचे आढळून आले.सदर रूग्णालयाने रस्त्यावर कचरा टाकल्याने या रूग्णालयाचे प्रमुख डाॅ परिक्षीत फेंगडे यांच्यावर पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केली.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

41 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!