Google Ad
Editor Choice india

दिलासादायक : प्रवासी , मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय … राज्यांना दिले निर्देश!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लॉकडाऊन जारी करण्यात आलं होतं. मात्र आता या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्याने शिथिलता आणण्यात येतेय. त्यानुसार आता केंद्र सरकारने आंतरराज्यीय वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशभरात आता कुठेही सामान आणि प्रवासी वाहतुकीसाठी ई पास लागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबात केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना निर्देश जारी केले आहेत. यासाठी केंद्राकडून राज्य सरकारला पत्र लिहिण्यात आलंय. त्याचप्रमाणे या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

केंद्र सरकारकडून वाहतुकीवरील निर्बंध कमी केलेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशभरात विविध राज्यांमध्ये तसंचच जिल्ह्यांमध्ये वाहतुकीवर अनेक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये होणाऱ्या वस्तूंच्या त्याचप्रमाणे सेवेच्या दळणवळणावर परिणाम होताना दिसतोय. यामुळे पुरवठ्याच्या साखळीत अडथळे निर्माण होत आहेत.”

Google Ad

राज्यांतर्गत आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये-जा तसंच मालाची वाहतूक यांच्यावर आता कोणतीही बंधन घालू नयेत असे आदेश आथा केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शेजारी देशांशी झालेल्या करारांअंतर्गत सीमेपलिकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतूकीसाठी परवानगी किंवा ई परमिटची आवश्यकता भासणार नाही.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!