Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यांना केले कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबत नोंदणीचे आवाहन … स्मार्ट सारथी अँप वर तातडीने करावी लागणार नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज ,( दि .२३ डिसेंबर ) : – कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -१९ लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत . या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड १९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी ( HCW ) यांची माहिती अहवाल ( डाटाबेस ) संकलन करण्याचे काम सुरु आहे .

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय , मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड -१९ प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे . राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय , मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , वैद्यकिय विभागामार्फत सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक , इंडियन मेडिकल असोशिएशन ( IMA ) , नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन ( NIMA ) , पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन ( PCDA ) , दंततज्ञ संघटना , पॅथोलॉजिस्ट संघटना , नर्सेस असोशिएशन , फार्मासिस्ट असोशिएशन यांनी कोविड -१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर तातडीने दोन दिवसात करावी . असे आवाहन डॉ.पवन साळवे अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!