Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

बँक ऑफ बडोदा मध्ये खाते असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणार हे लाभ …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्थापनेवरील कायमस्वरूपी कामकाज करणारे सुमारे ८५०० कर्मचारी असून महानगरपालिका या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेगवेगळ्या बँकेत जमा करते, परंतु या बँकेकडून कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांना आपले सॅलरी अकाउंट चे असणारे फायदे आपल्या मनपातील सर्व कर्मचा-यांना मिळावे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने विविध बॅंकांकडे विचारणा केली होती.

यावेळी सद्यःस्थितीत बँक ऑफ बडोदा सर्वाधिक लाभ देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन खाते असलेल्यांना या बँक खातेदारांना काही सुविधा मिळणार आहेत, या सुविधेमध्ये
१) झिरो बॅलन्स सुविधा
२) ४० लाखांपर्यंत अपघाती विमा
३) कायम अपंगत्व ४० लाख विमा
४) अशंत: अपंगत्व २० लाख
५) विमान अपघात १० लाख विमा

Google Ad

अशा प्रकारे या योजेनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना महासंघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन इतर बँकेमध्ये असल्यास त्यांनी बँक ऑफ बडोदा च्या पी.सी.एम.सी येथील शाखेत खाते उघडून या अपघाती विमा योजनेचा लाभ घेण्यात यावा.
याकामी बॅंक कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात खाते उघडणे कामी उपलब्ध असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, याकरिता खालील कागदपत्रे घेऊन पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात यावे असे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कळविले आहे.

१) पॅनकार्ड
२) आधार कार्ड
३) २ फोटो
४) सेवा नियमित आदेश
५) मनपा ओळखपत्र

त्यामुळे या बँकेत खाते उघडणाऱ्या ८५०० कर्मचाऱ्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!