Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी – चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उद्योगा पासून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकरण्यासाठी MIDC ने मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याकरता पुढाकार घ्यावा … माजी खासदार गजानन बाबर

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C) यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उद्योग पासून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकरण्यासाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (Common Effluent Treatetement Plant) बांधण्याकरता पुढाकार घेणे व तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी उद्योग खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना दिले आहे.

या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C)यांच्या सुमारे ११० एम. एल. डी पाणीपुरवठा होतो,
पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्याच्या उपाय योजनेचा एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचे माननीय आयुक्त यांनी C.E.T.P  उभारणे बाबत दिनांक १२/०६/२०१२,दिनांक २३/०१/२०१३ व दिनांक ०६/०३/२०१३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एम सी सी आय ए, यांचे सोबत मनपामध्ये बैठकी घेतल्या होत्या.

Google Ad

CETP(सीईटीपी)प्रकल्पाकरिता एमआयडीसीने भोसरी औद्योगिक क्षेत्रातील फुलेनगर, टी ब्लॉक ,प्लॉट नंबर टी/१८८  येथील सुमारे २ ते ३ एकर जागा नाममात्र दराने उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे .
औद्योगिक क्षेत्रात करण्यात येणाऱ्या CETP साठि एमआयडीसी, एमपीसीबी व एम सी सी आय ए,यांनी स्वतंत्र कंपनी ,Special Purpose Vehical (S.P.V) स्थापन करून या कंपनीमार्फत CETP उभारण्याचे काम करावयाचे आहे . सदर कंपनीमार्फत CETP प्रकल्पाचे संपूर्ण आर्थिक व तांत्रिक नियोजन करून प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित असून प्रकल्प खर्चाच्या 25 % हिस्सा तसेच आवश्यक असणार्‍या परवान्यासाठी अर्ज करणे इत्यादी कामे संबंधितांनी तात्काळ करून घेण्यात यावी.

सदर सीईटीपी साठी प्रकल्प अहवाल ( DPR  ) मनपा मार्फत तयार करून मिळणेबाबत ची मागणी एम सी सी आय ए त्यांची दिनांक २३/०५/13 च्या पत्रान्वये मनपाकडे केलेली होती त्यानुसार मनपाने CETP साठी DPR तयार करणे कामी  मे .अल्ट्राटेक एन्व्हायरमेंट कन्सल्टंट यांची नेमणूक करण्यात आलेली असून सदर कन्सल्टंट एमआयडीसी भागातील कंपन्यांचा सर्वे करून सांडपाण्याचे नमुने घेतलेले आहेत सदर माहितीवरून DPR  तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे सदरचा डीपीआर पुढील अंमलबजावणीसाठी एम सी सी आय ए, एमआयडीसी व एम पी सी बी यांना दिनांक  ०४/१०/२०१६ रोजी पाठवण्यात आला होता.

या  DPR नुसार  CETP उभारणे बाबतची अंमलबजावणी SPV  कंपनी मार्फत लवकरात लवकर होणे अपेक्षीत आहे व  याची अंमलबजावणी  SPV  कंपनीने  तात्काळ करावी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील औद्योगिक भागांमध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योग धंद्यापासुन तयार होणाऱ्या सांडपाण्यावर (Effluent ) प्रक्रिया करण्यासाठी मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र(Common Effluent  Treatement Plant) बांधण्यासाठी MCCIA, यांच्या विनंतीनुसार या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल DPR मनपा मार्फत तयार करून पुढील अंमलबजावणी कामी MCCIA यांच्याकडे सण २०१६  मध्ये सादर केलेला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांमधून तयार होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने पिंपरी-चिंचवड व भोसरी औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमधून सदरचे सांडपाणी शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीत मिसळते त्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी मनपाने सादर केलेल्या नुसार त्वरित CETP प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे याबाबत माननीय राष्ट्रीय हरित लवाद (NGT)  यांनी केस नंबर ३७/ २०१६ अंतर्गत दिनांक १८/०७/२०१८ चे आदेशान्वये त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

सदरचे प्रस्ताविक CETP उभारण्याचे काम MCCIA,MPCB, MIDC  यांचे संयुक्त SPV कंपनी मार्फत करणे आवश्यक आहे याबाबत मनपा मार्फत वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्यानुसार एमआयडीसीने पुढाकार घेऊन याबाबत त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नद्यांचे या मुळे होणारे प्रदूषण टाळणे शक्य होईल, असे निवेदन माजी खासदार गजानन बाबर मावळ लोकसभा यांनी दिले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!