Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आता ‘हे’ चालते का ? पोलीस आयुक्तांसोबत विनामास्क फोटो काढणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांवर आता कोण कारवाई करणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत पुण्यात ५ सप्टेंबरला एक बैठक पार पडली. या बैठकीत मास्क न घालणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करावा. असे आदेश देण्यात आले होते. शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी विनामास्क फोटो काढलाय? आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जातोय.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संज्योग वाघेरे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पालिका ठेकेदार बिपीन नानेकरसह आणखी एकाने आज सदिच्छा भेट घेतली. तेव्हा हा फोटो काढण्यात आला. पोलीस आयुक्त प्रकाश यांच्याशी संवाद साधताना या सर्वांनी मास्क घातलेला होता. पण आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला तर नाहीच पण यावेळी मास्क काढण्याची चूक या चौघांकडून घडली.

Google Ad

तेव्हा पोलीस आयुक्त प्रकाश यांनी मात्र मास्क घातलेलाच होता. पुणे जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पुणे शहरात तर पोलिसांनी आठवड्यातच एक कोटींचा दंड वसूल केला. अशात राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना आणि ठेकेदारांना यातून सूट आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!