Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड संपुर्ण कार्यक्षेत्रा मध्ये … दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी रात्री ०८.०० पासून ते १ मे २०२१ सकाळी ०७.०० वाजेपर्यंत असे असतील सुधारित आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० एप्रिल) : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड – १९ उपाययोजना नियम २०२० अंमलात आलेले आहेत.

कोविड – १९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका संपुर्ण कार्यक्षेत्रा मध्ये दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी रात्री ०८.०० पासून ते १ मे २०२१ सकाळी ०७.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत .

Google Ad

🔴पिंपरी चिंचवड शहराकरीता काय आहेत, सुधारित आदेश :-

१ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी दिनांक -१४.०४.२०२१ रोजीचा आदेशातील आवश्यक सेवा ( Essential Category ) मध्ये खालील नमूद दुकाने सकाळी ०७.०० ते ११.०० या वेळेतच सुरु राहतील .

▶️ सर्व प्रकारची किराणा माल ( Groceries ) , भाजीपाला दुकाने , फळविक्रेते , डेअरी , बेकरी , मिठाई , सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने ( फक्त क्षेत्रिय अधिकारी , पिंपरी चिंचवड मनपा यांनी प्राधिकृत केलेली ) , चिकन , मटण , मासे आणि अंडी विक्री करणारी दुकाने

▶️ कृषी संबंधित दुकाने आणि त्यांचेशी संबंधित आस्थापना ( बियाणे , खते , उपकरणे व त्यांचेशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) .

▶️पाळीव प्राणी खाद्याची दुकाने ( Pet Shop ) , > पावसाळ्याच्या हंगामाकरीता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने .

▶️उर्वरित आवश्यक सेवा ( Essential Category ) या दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशानुसार सुरु राहतील ,

वरील नमूद सर्व दुकाने / आस्थापनामार्फत घरपोच पार्सल सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०६.०० पर्यंत सुरु राहतील .

वरील नमूद दुकाने वगळता इतर बाबींसाठी इकडील दिनांक १४.०४.२०२१ व दिनांक १७.०४.२०२१ रोजीचे आदेश कायम राहतील ,

▶️ संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील , केंद्र सरकार / महाराष्ट्र शासन / पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार , अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील . सदर आदेश दि . २०.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असे आयुक्त राजेश पाटील यांनी कळविले आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

207 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!