Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : बुधवार ३० सप्टेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. ३९ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ७६४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज ८२७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे भोसरी (पुरुष ६४ वर्षे,पुरुष ३८ वर्षे), चिंचवड (पुरुष ५६ वर्षे, स्त्री ६० वर्षे), च-होली (पुरुष ५४ वर्षे, पुरुष ७७ वर्षे), दिघी (पुरुष ५० वर्षे), काळेवाडी (स्त्री ५० वर्षे), चिखली (पुरुष ५१ वर्षे), पिंपरी (पुरुष ५० वर्षे), कासारवाडी (पुरुष ६४ वर्षे), कृष्णानगर (पुरुष) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे हडपसर (पुरुष ६८ वर्षे), चाकण (पुरुष ६३ वर्षे), मुळशी (पुरुष ६० वर्षे), सातारा (पुरुष ५५ वर्षे), हिंजवडी (पुरुष ३९ वर्षे) येथील रहिवासी आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे १४८७३०७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ११२० व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता २३५ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

पाऊस असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

20 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!