Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. २७ ऑक्टोबर २०२० ) रोजी १४४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १२७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १६५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – चिखली ( ८० वर्षे ) , आकुर्डी ( ७३ वर्षे ) , पिंपळे गुरव ( ६० वर्षे ) , निगडी ( ७० वर्षे ) , चिंचवड ( ५७ वर्षे ) ०३ स्त्री- मोशी ( ६२ वर्षे , ७६ वर्षे ) , कासारवाडी ( ८५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – लोनावळा ( ५५ वर्षे ) , वाघोली ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम ( दुसरा टप्पा ) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २०५५५७० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ४ ९ ६७ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १७१ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगाव .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!