Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिवाळीच्या काळात प्रतिबंधनात्मक खबरदारी घेण्याचे पिंपरी चिंचवड आयुक्तांनी काढले आदेश … काय आहेत सूचना!

महाराष्ट्र 14 न्यूज , ( दि . ११ नोव्हेंबर २०२० ) : कोविड -१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोना बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो , ही बाब लक्षात घेऊन फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे .

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे सातत्याने प्रयत्न केले जात आहे . विविध स्तरावर अहोरात्र केलेले प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या कोवीड नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे . असे असले तरी कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे . शारिरीक अंतरभान , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा नागरिकांनी अवलंब करावा असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले .

Google Ad

कोविड बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा अथवा कमीत कमी करावा . लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेने स्वतंत्र आदेश जारी केला आहे .

महापालिकेची उद्याने , मैदाने , पर्यटन स्थळे , शाळा इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत . तसेच सर्व खाजगी परिमगत फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा अथवा कमी करावा . कोविड -१९ बाधित रूग्णांना त्रास होऊ नये यामाठी ध्वनी प्रदूषण न होणारे कमी आवाजाचे तसेच कमी धूर होणा – या फटाक्यांचा वापर करावा . दिपावली हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो . या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते .

त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिवाळी उत्सवानंतरही बराच कालावधीपर्यंत दिसून येतात . कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे . ही बाब विचागत घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे . दिवाळीच्या काळात नागरिकांनी कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील .

कोविडच्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने दिवाळीमध्ये दिवे लावताना तसेच फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापर टाळावा . या काळात हात स्वच्छ करताना सॅनिटायझर ऐवजी साबण अथवा हॅन्डवॉशचा नियमितपणे वापर करावा . दिवाळी नियंत्रित स्वरूपात माजरा करायची असल्याने या काळात दिवाळी पहाट सारखे कोणत्याही प्रकारचे सामुदायिक , सांस्कृतिक , सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण कार्यक्रमांना परवानगी नसेल . असे कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत .

खरेदीसाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास योग्य ती खबरदारी घेऊन शक्यतो कमी गर्दीच्या वेळी आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे . कोविडच्या अनुषंगाने नियमभंग करणे , मास्क सुयोग्य प्रकारे परिधान न करणे , रस्त्यावर थुकणे , विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करणे तसेच गर्दी करणा – यांवर दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्याच्या मूचना सर्व महाय्यक आरोग्य अधिकारी , आरोग्य निरीक्षक आणि पोलीस प्रशासनाला आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या आहेत .

यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले मर्व उपक्रम , त्याकरिता निर्गमित करण्यात आलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरू गहतील . कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०. तसेच भारतीय दंड मंहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतूदीनुमार कारवाईस पात्र गहील . सदर आदेश दि . १० नोव्हेंबर २०२० पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लागू राहतील .

 

 

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!