Google Ad
Editor Choice

पक्षांसह संघटनांतर्फे गुरुवारी पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ डिसेंबर) : महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बहुजन महापुरुष सन्मान समिती, पिंपरी- चिंचवड यांनी गुरुवारी (ता.८) शहर बंदची हाक दिली आहे. याला राजकीय पक्षांसह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सर्वानी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेस माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकतें मानव कांबळे, मारुती भापकर, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, जमाते उलेमा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष हाजी गुलजार, काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, आपचे चेतन बेंद्रे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सचिव राजेंद्र साळवे, बौद्ध समाज विकास महासंघाचे सहसचिव विशाल कांबळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जीवन बोराडे, आझाद समाज पार्टीचे रहीम सय्यद, राष्ट्रीय इसाई महासंघाचे शहराध्यक्ष राजन नायर,

Google Ad

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष शांताराम खुडे, कष्टकरी संघटना महासंघाचे राजू बिराजदार, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गन्ध, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे शहाबुद्दीन एम. शेख, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, भिमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख, बारा बलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, फेरीवाला हॉकर्स महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद कांबळे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे आदी उपस्थित होते. या सर्व संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला. विनायक रणसुंभे यांनी सूत्रसंचलन केले.

▶️या आहेत मागण्या.

राजपाल कोशारी यांना पदावरून हटवावे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी जनतेची माफी मागावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करून जनतेची माफी मागावी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement