Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोविड-१९ लसीकरण केंद्रात मदत व मार्गदर्शन केंद्राची उभारणी

 

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३० मार्च ) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने कोरोनाची लस प्रत्येक नागरिकाला मिळावी ह्या करिता लसीकरण व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे.

Google Ad

त्या अनुषंगाने आमदार महेशदादा लांडगे यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र उभारण्यात आली. प्रत्येक भागात ६० वयावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ या वयोगटातील इतर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना या केंद्रावर नोंदणी करून लस देण्यात येत आहे.

सामाजिक भान व दायित्वाची जाणीव हा मुलं मंत्र जपत भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने भाजपा अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गर्शनाखाली व युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या पुढाकाराने भोसरी विधानसभेत युवा मोर्चाच्या वतीने आपापल्या भोसरी चिखली मोशी व इतर भागात लसीकरण असलेल्या ठिकाणी नागरिकांनासाठी येण्याजण्या करिता वाहन व्यवस्था तसेच ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी साठी मदत व मार्गदर्शन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

पदाधिकारी स्वतः सदर ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडविताना व अडचणी दूर करून सहकार्य करताना अग्रेसर दिसतात. त्यांच्या ह्या कार्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य असून ते समाधान व्यक्त करीत आहेत
ह्या सर्व कार्यात जिल्हा सरचिटणीस दिनेश यादव, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज लांडगे, जिल्हा चिटणीस रवी शेठ जांभूळकर , भोसरी चाऱ्होली मंडल अध्यक्ष उदय गायकवाड हे नागरिकांना लसीकरणासाठी मदत करत आहेत.
इथून मागच्या संकटाच्या काळात युवा मोर्चा नेहमी अग्रेसर राहिला आहे व इथून पुडच्या काळात ही येणाऱ्या प्रत्येक अडचणी वरती मात करणाऱ्या करिता व लोकांच्या सेवे करिता नेहमी तत्पर राहू अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!