Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी – चिंचवडमध्ये एका महिलेला मुलगा जन्मला असं सांगितल्यानंतर चार दिवसांनी मात्र हातात दिली मुलगी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलेला मुलगा जन्मला असं सांगितल्यानंतर चार दिवसांनी मात्र हातात मुलगी देण्यात आली. हा धक्कादायक प्रकार डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महापालिकेकडे नोंदवण्यात येणाऱ्या जन्म दाखल्यावर मुलगा लिहिल्याचा दाखला नातेवाईकांकडे आहे. पण, रुग्णालय प्रशासनाचे डॉ. देशपांडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या प्रत्येक नोंदवहीमध्ये मुलीचा जन्म झाल्याची नोंद आहे, असे सांगण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात ११ ऑगस्टच्या रात्री रिटा जगधने यांची प्रसुती झाली.

ज्यावेळी रिटा यांची प्रसूती झाली, त्यावेळी त्यांची आई हिराबाई नवपुते या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. प्रसूती झाल्यावर त्यांना रुग्णालयामधील नर्स स्टाफने तुमच्या मुलीची प्रसूती झाली असून त्यांना मुलगा झाला असल्याचे हिराबाई नवपुते यांना सांगितलं. पण, बाळाला काही दिवस काचेत ठेवावे लागेल, असं आई हिराबाई यांना सांगण्यात आले. मग कागदावर अंगठा देऊन त्या बाहेर आल्या. आई हिराबाईंनी बाहेर येताच बाळाचे वडील अनिल जगधने यांना मुलगा झाल्याची बाब सांगितली. काही वेळाने पत्नी रिटा यांना प्रसूतिगृहात बाहेर आणताच, सगळे आनंदात होते.

Google Ad

दुसऱ्या दिवशी महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या जन्म नोंदणीच्या दाखल्यावर ही मुलगा अशी नोंद करण्यात आली. पुढील चार दिवस नर्स आईकडून दूध घायच्या आणि काचेत ठेवलेल्या बाळाला पाजत असत १५ऑगस्टला बाळाच्या तब्येतील सुधारणा झाल्याने, त्याला आईकडे सुपूर्त करण्यात आलं.  बाळ हातात आल्याच्या आनंदात हे कुटुंब होतं. पण, थोड्यावेळाने बाळाने शी केलीये का? याची चाचपणी केली असता बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचं कुटुंबियांना समजलं.त्यानंतर हिराबाईंनी तातडीने रुग्णालयाला याचा जाब विचारला. तेव्हा रुग्णालयाने त्यांना खोटं ठरवायला सुरुवात केली.

रुग्णालयातील प्रत्येक कागदावर मुलगी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. जन्म दाखला नोंदणीच्या अर्जावर मात्र, रुग्णालयाने उडवाउडवीची उत्तरं दिली, असे आरोप नातेवाईकांनी केले. यानंतर जगधने कुटुंबियांनी माध्यमांकडे धाव घेतली. माध्यमांनी अधिक माहितीसाठी प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, रुग्णालयाच्या प्रत्येक नोंद वहीमध्ये मुलीची नोंद असल्याचं सांगत जगधने कुटुंबियांचे आरोप फेटाळले. पण, महानगरपालिका जन्म नोंदणी दाखल्यावरील नोंदीबाबत त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. जगधने कुटुंबियांनी केलेले आरोप आणि रुग्णालयाकडून दिलं जाणारं स्पष्टीकरण पाहता, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

136 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!