Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

गरिबांची लूट करणाऱ्या “ शहरातील सिटी केअर हॉस्पिटल , जीवन ज्योती हॉस्पिटल , डिवाइन हॉस्पिटल यांच्यावर कडक कारवाईची ” … आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड “ शहरातील खाजगी रुग्णालये सिटी केअर हॉस्पिटल , जीवन ज्योती हॉस्पिटल , डिवाइन हॉस्पिटल यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन आमदार लक्ष्मण जगताप यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

या निवेदनात ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने कोरोना विषाणू कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि . १३ मार्च २०२० पासून लागू करून अधिसूचना निर्गमित केलेली आहे . ज्याअर्थी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड -१९ बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत अनेक तक्रारी शासन स्तरावरती प्राप्त झाल्या नुसार दि .२१ मे २०२० च्या अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय बिलाचे लेखा परिक्षण करणे गरजेचे असल्याचे समजते .

Google Ad

तरी आपल्या स्तरावरून आपण समितीचे गठण करून नेमलेले अधिकारी यांनी काही खाजगी रुग्णालयांवर नोटीस देण्याची कारवाई केली . परंतु या खाजगी रुग्णालयांवर याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही . त्यांनी गरिबांना लुटायचे ठरविलेलेच आहे असे दिसते . आपण गठीत केलेल्या पथकाची माहिती हि शहरातील नागरिकांपर्यंत अद्यापही पोहचलेली नाही . यामुळे शहरातील कोविड बाधित रुग्णांना बिलासंदार्भातील अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे असे दिसून येते . आपल्या सारथी तसेच पिं.चिं.मनपाच्या ऑफिशीअल संकेतस्थळ यांवर कोविड १९ च्या पथकाची कोणतीही माहिती नोंदवली गेली नसून याचा नागरिकांना नाहक त्रास होताना दिसत आहे .

नागरिकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यासाठी आपण आपल्या सर्व संकेतस्थळावर नागरिकांसाठी कोविड १९ च्या पथकाची माहिती , दूरध्वनी क्रमांक , व्हाटस अप क्रमांक उपलब्ध केल्यास नागरिकांच्या बिलासंदार्भातील समस्यांचे निवारण लवकरात लवकर होईल व शहरातील खाजगी रुग्णालयातून गोरगरीब नागरिकांची होणारी लुटमार कमी होऊन खाजगी रुग्णालयांना चाप बसेल . आमच्या कार्यालयामध्ये वारंवार कोविड १ ९ च्या बिलासंदार्भातील तक्रारी मध्ये वाढ होत असून त्यात पिंपरी – चिंचवड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल , जीवन ज्योती हॉस्पिटल डिवाइन हॉस्पिटल हे रुग्णांची बिलासाठी मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असून त्यांना भस्म्या रोग असल्यासारखे नागरिकांकडून पैसे उकळत आहेत , तरी हे थांबविण्यासाठी संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करावी.

या अगोदरही आमदार लक्ष्मण जगताप यांनी कोरोनाच्या अपडेट्स बाबत दिलेल्या या आदेशावर शनिवार १८ जुलैपासून महापालिकेने अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेने कोरोनासाठी वॉररुम तयार केली आहे. या वॉररुममध्ये डॅशबोर्ड तयार करून दररोज कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी अपडेट केली जाते. याच डॅशबोर्डवर आता खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले एकूण बेड, किती बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यात आले आहेत आणि किती बेड शिल्लक आहेत याची माहिती अपडेट करण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे.

तसेच राज्य शासनास पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील सर्व धर्मादाय व खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करा; अशी मागणीही आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. आपल्या भागातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लक्ष्मण जगताप हे गोरगरिबांनाच्या घराघरात पोहचले आहेत, त्यामुळे जनतेचीही त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

56 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!