Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरवच्या ‘कावेरी जगताप’ यांनी सामाजिक बांधिलकी जपत … केली सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळात आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी न करता रात्रंदिवस नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला महत्त्व दिले, अशा गोरगरीब कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून त्यांच्या घरातही दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश यावा या करीता

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील ‘मुक्तांगण महिला गृहउद्योग’ संस्थेच्या वतीने अध्यक्षा ‘कावेरी संजय जगताप’ यांनी पिंपळे गुरव परिसरातील साफसफाई करणाऱ्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना स्वतः बनविलेल्या दिवाळी फराळाचे वाटप करून कामगारांच्या जीवनात प्रकाश फुलविला, यामुळे कामगार महिलांची दिवाळी गोड झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. याप्रकारे अनेक सेवाभावी उपक्रम मुक्तांगण महिला गृहउद्योग संस्थेच्या माध्यमातून या परिसरात राबविले गेले आहेत.

यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा ‘कावेरी जगताप’ म्हणाल्या ” कोरोनाच्या या महाभयंकर संकट काळात आपला जीव धोक्यात घालून स्वतःच्या कुटूंबाची पर्वा न करता या कामगारांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या घासातील एक घास देऊन आपल्या कामगार बंधू भगिनींची दिवाळी गोड केली पाहिजे, त्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणे हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.कावेरी जगताप, निर्मला नवले, मनीषा काटे, कस्तुरी कोलते, कविता दळवी या महिलांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला. या प्रसंगी श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, आरोग्य निरीक्षक माने, सोमनाथ नवले, मुकादम राजू कदम, प्रतिक टांक,आकाश नवले भारत नवले, दुर्वांकुर कवडे, प्रसाद नवले,अमित कुंभार परिसरातील नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!