Google Ad
Editor Choice Entertainment Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने ‘कोरोना सोबत जगताना’ … फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी व्हा!

महाराष्ट्र 14 न्यूज, : जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि . १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२० दरम्यान कोरोना सोबत जगताना या विषयावरील फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे . सदर स्पर्धा हि विनामुल्य असून यामध्ये शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे . दरवर्षी १ ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात येतो .

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या प्रदुर्भामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल घडलेला आहे . घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे , सोशल डीस्टंसिंगचे पालन करणे , मर्यादित प्रवाशांसह वाहन प्रवास करणे , मर्यादित कर्मचा – यांसह कार्यालयीन कामकाज करणे आदी बाबींचा दैनंदिन जीवनामध्ये नव्याने समावेश झाला आहे . कोरोना सोबत जगताना दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या बदलांचे चित्रण स्पर्धकांच्या छायाचित्रांमधून दिसणे अपेक्षित आहे असे या स्पर्धेचे परिक्षक प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी सांगितले .

Google Ad

स्पर्धेसाठी २१ वर्षाखालील गट , महिला गट व खुला गट असे तीन गट करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी र.रु. ५,००० / – व प्रशस्तीपत्रक , द्वितीय क्रमांकासाठी र.रु. ३,००० / – व प्रशस्तीपत्रक , तृतीय क्रमांकांसाठी र.रु. २,००० / – व प्रशस्तीपत्रक तर दोन उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी प्रत्येकी र.रु. १,००० / – व प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपाची बक्षिसे दिली जाणार आहेत . या स्पर्धेसाठी प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त व आर्टिस्ट कम फोटोग्राफर परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत .

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे [email protected] या ईमेल वर त्यांच्या संपूर्ण नाव , वय , पत्ता व मोबाईल क्रमांकासह दि . १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२० दरम्यान पाठवावीत . प्रिंट स्वरूपातील छायाचित्रे स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाहीत . एक स्पर्धक कमाल ५ छायाचित्रे स्पर्धेसाठी सादर करू शकेल . स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारा प्रत्येक फोटो किमान २ mb चा असावा . या स्पर्धेसाठी मोबाईलवर काढलेले फोटो तसेच इतर कोणत्याही कॅमेराद्वारे काढण्यात आलेले फोटो पात्र राहतील . स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी श्री.साळवी विलास ( मो.क्र . ८८५५८ ९ २८०३ ) व श्री . पुरंदरे खुशाल ( मो.क्र . ९ ६६५८७५०८८ ) यांच्याशी संपर्क संपर्क साधावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!