Google Ad
Editor Choice Education Maharashtra

Mumbai : दहावी, बारावी नंतरच्या डिप्लोमाचे प्रेवेश १० ऑगस्टपासून सुरू …

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने पोलिटेक्निक कॉलेजांमध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या प्रवेशासाठी सुविधा केंद्र उभारल्यानंतर , आता प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया येत्या १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे .

त्याचप्रमाणे बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियादेखील सुरू होणार आहे . करोनामुळे यंदा संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे . या प्रवेश प्रक्रियेची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी द्विटद्वारे दिली आहे . दहावीच्या निकालानंतर डिप्लोमा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते . यंदा , मात्र दहावी निकाल जाहीर झाल्यानंतरही डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नव्हती .

Google Ad

पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्याला सुरुवात झाली . मात्र , प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते . अखेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून प्रवेशप्रक्रिया येत्या १० ऑगस्टपासून ऑनलाइन सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले . यंदाच्या वर्षातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमा प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची ; बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे . अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती www.dte.org.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!