Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर पिंपरी नेहरूनगर येथे कोविड -१९ सेंटरची उभारणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.५ ऑगस्ट : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. रूग्णवाढीचा आलेख लक्षात घेता नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयवर कोरोनाचे तात्पुरते रूग्णालय (कोविड केअर सेंटर) तयार करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा आलेख वाढत आहे. त्यामुळे वाढीव रूग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेने युद्धपातळीवर या कोविड सेन्टरचे नियोजन केले आहे. त्यानुसार कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे.

नेहरूनगर येथे हे रूग्णालय मगर स्टेडियमच्या सव्वा पाच एकर जागेवर कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये उभारण्यात येणाऱ्या कोविड -१ ९ सेंटरची पाहणी आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली . यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर , पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुहास दिवसे , विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी संजय भुकण , शहर अभियंता राजन पाटील , कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी उपस्थित होते .

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!