Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २ डिसेंबर २०२२:-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शनिवार दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक तसेच दिव्यांग बंधू- भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.

          सकाळी ११ वाजता चिंचवड येथील मूक- बधीर विद्यालयातील मुलांच्या सांकेतिक भाषेतील  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होईल. भोसरी येथील पताशीबाई रतनचंदमानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतील विद्यार्थी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करतील. या कार्यक्रमात दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती देणारा  प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थी आणि नागरिकांचा  सत्कार करण्यात येणार आहे.

Google Ad

‘दिव्यांग नागरिकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर अक्षय सरोदे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी १ वाजता सुप्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक तसेच दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे,  असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement