Google Ad
Editor Choice Education

श्रीनगर काळेवाडी पिंपरी चिंचवड येथेमहिलांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९नोव्हेंबर) : श्री सेवा आदिवासी महिला मंडळ पुणे व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्रीनगर काळेवाडी पिंपरी चिंचवड येथे 9/11/22 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळात करण्यात आले होते.

या कार्यक्रमास उपस्थित महिलांना सौ जागृती धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाविषयी माहिती व कार्यक्रमाचे वैशिष्ट्य व कार्यक्रमामुळे महिलांना होणारे फायदे याचे विषयी संस्थेच्या अध्यक्षिका कल्पना सुपे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव कोमल सुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना सुपे यांनी केले.

Google Ad

या कार्यक्रमात महिलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन महिलांनी आपल्या निर्णय क्षमता कशी विकसित केली पाहिजे स्वतःची सुप्त गुण ओळखून ते कशी विकसित होणे अपेक्षित आहे याची जाणीव व सुंदर अशी माहिती या महिलांना या कार्यक्रमात देण्यात आली तसेच आपल्या आयुष्यात आपण संसार मुलं बाळ पती सांभाळून आपण देखील आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतो याची जाणीव करून दिली काही महिलांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमात उपस्थित राहून माझा आत्मविश्वास आता वाढला आहे असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात 60 महिला बहिणी सहभागी झाल्या होत्या

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement