Google Ad
Editor Choice

15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणार पुणे चिंचवड मधील पिंपरी चिंचवड एरिया मध्ये बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय गुणांकनाची स्पर्धा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० नोव्हेंबर) : बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर पुणे चिंचवड मधील पिंपरी चिंचवड एरिया मध्ये बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय गुणांकनाची स्पर्धा दिनांक 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 होणार आहे. ही स्पर्धा फिडे इंस्ट्रूक्टर श्री प्रतीक मुळे यांच्या सहयोगाने पुढाकाराने व त्यांच्या टेक्निकल मूह्वज चेस अकॅडमी च्या मार्फत चिंचवडे लॉन्स येथे बिर्ला हॉस्पिटलच्या समोर होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे यात ग्रँड मास्टर आर आर लक्ष्मण तसेच इंटरनॅशनल मास्टर खेळत आहेत.

या स्पर्धेत महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात, गोवा, कर्नाटका, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ,कर्नाटका, केरळा, हरियाणा, उडीसा, राजस्थान ,मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणच्या खेळाडूंनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा चा फायदा या भागातील नवीन होतकरू खेळाडू यांना होणार आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील खेळाडूंशी खेळताना डावामध्ये विविधता येते व असे खेळताना खेळाडूंचा अनुभव मोठा होतो. अन्यथा अनुभवासाठी खेळाडूंना त्या त्या प्रदेशात खेळायला जावे लागते. अशी स्पर्धा जवळजवळ 32 वर्षाच्या कालखंडानंतर पिंपरी चिंचवड भागामध्ये होत आहे. याला अनेक पालकांनी व शाळांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या स्पर्धेबाबत आयोजकांची बोलत आहेत. सदर स्पर्धेत खेळणे हे पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंना बुद्धिबळाच्या एक सुवर्णसंधी ठरणार आहे. सर्व घटकांनी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा आयोजकांचे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे व करावा अशी विनंती.
या स्पर्धेचे एकूण पारितोषिके रुपये अडीच लाख आहे.

Google Ad

ही स्पर्धा पुणे जिल्हा चे सर्कल तसेच महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन च्या मान्यतेने भरवली जात आहे. यात खुल्या गटात प्रथम पारितोषिक चाळीस हजार रुपये असून सोबत चमचमता करंडक दिला जाणार आहे तसेच द्वितीय खेळाडूला सुद्धा 25000 रुपये व आकर्षक असा करंडक दिला जाणार आहे.

प्रोत्साहन पर बक्षिसांचे वाटप सुद्धा होणार आहे त्यात प्रामुख्याने इलो रेटिंग सोळाशे ते तेराशे एक तसेच तेराशे पेक्षा कमी साठ वर्षावरील खेळाडू लेडीज खेळाडू महिला खेळाडू उत्तम टी एम सी ए चा खेळाडू आणि अव्यंग खेळाडूंसाठी बक्षीस आहेत. तसेच 13 वर्षाखालील अकरा वर्षाखालील नऊ वर्षाखाली सात वर्षाखाली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंसाठी उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवली आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!