Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची संधी!

महाराष्ट्र 14 न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विशेष आर्थिक मागास प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2020 या वर्षासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या चार परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरले आहेत; मात्र सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी’ आरक्षणावर स्थगिती आणल्याने या परीक्षा अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. परीक्षा घेण्यास विलंब होत असल्याने एमपीएससी’च्या कारभारावर टीका केली जात आहे. त्यातच आता राज्य शासनाने 23 डिसेंबर 2020 रोजी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एसईबीसी’ प्रवर्गातील अर्जामधील प्रवर्ग बदलण्याची सूचना एमपीएससी’ने केली आहे.

Google Ad

आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन एसईबीसी’ आरक्षणासाठी दावा केलेल्यांनी खुला गट किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी एका आरक्षणाचा पर्याय निवडावा, खुला किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय या मुदतीत न निवडणार्‍या उमेदवारांचा फक्त खुल्या गटासाठीच विचार केला जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार एसईबीसी’ आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही. या मुदतीत कोणताही पर्याय न निवडणार्‍या उमेदवाराच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर मान्य केली जाणार नाही, असेही बजावण्यात आले आहे.

एमपीएससी’ने एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुला किंवा इडब्ल्यूएस प्रवर्ग निवडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी आमच्यावर हा अन्याय करणारा निर्णय आहे, सर्वोच्च न्यायालयात दहा फेब्रुवारीपर्यंत अंतिम निकाल येईपर्यंत वाट पहायला हवी होती. जर आरक्षण टिकले, तर पुन्हा प्रवर्ग बदलावे लागतील, अशी भूमिका मराठा विद्यार्थी परिषदेने घेतली आहे. इतर विद्यार्थ्यांनी याचे स्वागत केले आहे. प्रवर्ग बदलाची प्रक्रिया झाल्यानंतर आयोगाकडून लवकर परीक्षांच्या तारखा जाहीर होतील, असे सांगितले आहे. यावरून सोशल मीडियामध्ये दोन्ही गटांत वाद सुरू झाला आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!