Google Ad
Editor Choice india

Delhi : सर्वसामान्यांच्या माथी केंद्र सरकार कडून कोविड सरचार्जचा भुर्दंड बसणार … १ फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱया अर्थसंकल्पात याचा असेल समावेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना महामारीत ढेपाळलेली देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार देशभर कोविड सरचार्ज लागू करणार आहे. 1 फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱया अर्थसंकल्पात याचा समावेश असेल. सध्या केंद्रालाच मोठय़ा प्रमाणावर निधीची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या माथी सरचार्जचा भुर्दंड बसणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

संसदीय व्यवहार मंत्रिमंडळ समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांबाबत मंगळवारी शिफारस केली. त्यावर मंत्रीमंडळ अंतिम निर्णय घेणार आहे. अधिवेशनावेळी कोरोनाशी संबंधित सर्व नियम पाळले जाणार आहेत. यापूर्वी कोरोना फैलावाच्या कारणावरून संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केले होते.

Google Ad

महामारीतील आर्थिक संकटाला तोंड देत असलेली जनता केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे आशेने पाहत आहे. मात्र महसूलातील तूट व कोरोना लसीच्या खर्चाचे कारण पुढे करीत सरकार जनतेवरच कोविड सरचार्ज लागू करणार आहे. केंद्राने याआधीच सरकारी कंपन्यातील हिस्सेदारी विकून निधी जमवण्याचा आटापिटा केला आहे. त्यातूनही तिजोरीत तितकीशी भर न पडल्यामुळे आता कोविड सरचार्जचा आधार घेतला जाणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!