Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांचे स्मृतीदिना निमित्त चापेकर बंधूंच्या चिंचवड येथील समूह शिल्पास महापौर माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि .१८ एप्रिल ) : क्रांतीवीर चापेकर बंधूचे बलिदान देशभक्तीचा अखंड प्रेरणास्त्रोत आहे . भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर असून ही शौर्यगाथा नव्या पिढीला सतत स्फुर्ती आणि नवचेतना देत राहील असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांचे स्मृतीदिना निमित चापेकर बंधूंच्या चिंचवड येथील समूह शिल्पास महापौर माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . त्यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , स्थायी समिती सभापती अॅड.नितिन लांडगे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आयुक्त राजेश पाटील , नगरसदस्य मोरेश्वर शेडगे नगरसदस्या अपर्णा डोके अश्विनी चिंचवडे , प्रभाग अधिकारी सोनल देशमुख , गुरुकुलम संस्थेचे आसाराम कसबे माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते .

Google Ad

महापौर माई ढोरे यांच्यासह उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , स्थायी समिती सभापती अॅड.नितिन लांडगे नगरसदस्य मोरेश्वर शेडगे , नगरसदस्या अपर्णा डोके अश्विनी चिंचवडे , प्रभाग अधिकारी सोनल देशमुख यांनी चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधूच्या नियोजित स्मारकास भेट दिली . त्यावेळी स्वातंत्र्य इतिहासाच्या स्मृती जागविल्या . स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरूध्द भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष होता .

भारतीय नागरिकांना अन्यायकारक वागणूक देणा – या इंग्रज अधिकारी रॅन्डची दामोदर बाळकृष्ण वासुदेव या चापेकर बंधूनी पुण्यात हत्या केली . त्यामुळे ब्रिटिशांनी चापेकर बंधूना फाशीची शिक्षा दिली.चापेकर बंधूनी रॅन्डच्या हत्येनंतर त्यांचे जवळील शस्त्रे चिंचवड येथील चापेकर वाड्यातील विहिरीत टाकली होती . या सर्व स्मृती चापेकर वाड्यात जतन करून ठेवल्या आहेत . शिवाय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची छायाचित्रांसह माहिती प्रदर्शनार्थ ठेवलेली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!