Google Ad
Editor Choice Pune

कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात पुण्यातील एक संपूर्ण कुटुंब संपवलं … एकाच कुटुंबातील पाच जणांचा गेल्या १५ दिवसांत कोरोनाने मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जाधव कुटुंबच संपलं. एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने, कोरोनाचं भयाण रुप समोर येत आहे.

▶️पूजेच्या निमित्ताने एकत्र

Google Ad

जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.

▶️बेडसाठी वणवण, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनही संपला

रोहीत जाधवांना बाणेर कोव्हीड सेंटरला ॲडमिट केलं. दुसरा भाऊ 40 वर्षांचा अतुल कोथरुडच्या देवयानी रुग्णालयात. वैशालींची आई अलका जाधव विश्रातवाडीच्या रुग्णालयात दाखल होत्या. 28 मार्चला वैशाली यांना त्रास व्हायला लागला. वैशालीची ॲाक्सिजन पातळी कमी होती. त्यांना आधी भारती हॉस्पिटलला गेलो. तिकडे बेड मिळाला नाही म्हणून रुबीला नेलं, अन शेवटी ॲम्ब्युलन्समधला ॲाक्सिजन संपत आला, तेव्हा ड्रायव्हरने मदत केली आणि आम्ही त्यांना खेड शिवापुरच्या श्लोक रुग्णालयात दाखल केले. तिथे एक दिवस ठेवलं. प्रकृती सुधारतेय असं वाटतानाच दुर्दैवाने 30 मार्चला त्यांचा मृत्यू झाला.

▶️पुणेकरांनो आता तरी सावध व्हा, अन नियमांचे पालन करा

3 एप्रिलला रोहित शंकर जाधव गेले. 4 एप्रिलला त्यांची आई अलका शंकर जाधव यांचे निधन झाले. तर 14 एप्रिलला 40 वर्षांच्या अतुल शंकर जाधव यांचाही मृत्यू झाला. आता मागे उरले आहेत ती रोहीत आणि अतुल यांच्या पत्नी, मुलं आणि वैशाली गायकवाडांचे कुटुंबीय. घरातले सगळे गेले, आधार नाही. अशात आता पुढे काय असा प्रश्न आज त्या संपूर्ण कुटुंबासमोर आहे. जाधवांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाने केवळ 15 दिवसात उध्वस्त केलंय. तेव्हा पुणेकरांनो आता तरी सावध व्हा, अन नियमांचे पालन करा. कोरोना होत्याचं नव्हतं करतोय. त्याला हलक्यात नका घेऊ.

▶️पुण्यात कोरोनाची भीषण स्थिती

पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णवाढीचा वेग जोराने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.

▶️मनसे नगरसेवकाने 40 बेडचं हॉस्पिटल उभारलं

पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड सुरु करावेत आणि पुणेकरांचे प्राण वाचवावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं आहे. मोरेंनी पुण्यात एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेड असलेले हॉस्पिटल सुरु केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!