Google Ad
Editor Choice Entertainment Pimpri Chinchwad

नवी सांगवीत लोकसेवा सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने … प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य कला स्पर्धा – २०२१ चे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज : नवी सांगवी येथील लोकसेवा सांस्कृतिक मित्र मंडळ आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य कला स्पर्धा – २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी दि. २६ जानेवारी २०२१ रोजी भव्य चित्रकला आणि रांगोळी स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

Google Ad

कोरोना महामारीच्या काळात आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘ ‘करोना योद्धा‘ या विषयावर रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. सदर कार्यक्रमात कोरोना महामारीमध्ये करोनायोद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्याना प्रोत्साहन म्हणून तसेच आरोग्यविषयक घ्यावयाच्या काळजीची सवय लावून कुटुंबीय व सर्व जनतेमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम राबविण्यात आल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

चित्रकला स्पर्धा – सकाळी– ९ ते १० वा.
गट: वयवर्षे ३ ते १५
चित्र काढण्यासाठी कागद आयोजकांच्या वतीने देण्यात येईल, इतर सर्व साहित्य स्पर्धकाने आणावयाचे आहे.

रांगोळी स्पर्धा :- खुला गट
रांगोळी काढण्यासाठीचे सर्व साहित्य स्पर्धकांनी आणावयाचे आहे*. वेळ :- सायंकाळी- ५.०० ते ६.०० वा.

🔴रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेसाठी विषय :-

१)  भारतीय प्रजासत्ताक
२)  करोना योद्धा
३)  माझी शाळा

🔴प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक बक्षिसे

🔴सहभागासाठी संपर्क :-
निधी एंटरप्राइजेस अँड प्रॉपर्टी
शॉप नं. २, शुभम अपार्टमेंट, आदर्श नगर
संपर्क मोबाईल : 9767676723

आयोजक : – जयभावनी मित्र मंडळ, जगदंब युवा प्रतिष्ठान, ओम साई ग्रुप

तसेच सायंकाळी — ७ ते -९ वा. या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे!

🔴स्थळ — अंबामाता मंदिर आदर्श नगर, नवी सांगवी, पुणे

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

63 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!