Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार लक्ष्मण जगताप कला,क्रिडा अकॅडमी आणि राही-माई प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदीपक क्रीडा स्पर्धा … सांगवीत महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या संकटातून सावरताना आता प्रत्येकाला आपली मानसिकता कणखर करावी लागणार आहे. तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणे काळाची गरज बनली आहे. कोरोनामुळे आपल्या मनात निर्माण झालेली निराशा व्यायाम, विविध खेळ, सांस्कृतिक आणि मनोरंजनांच्या कार्यक्रमांनी घालवता येणे सहज शक्य आहे.

म्हणूनच पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय व आरोग्यदायी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मा.नगरसेवक श्री.शंकरशेठ जगताप यांच्या मार्ग दर्शनात श्री.लक्ष्मण जगताप कला क्रीडा अकॅडमी आणि राही-माई प्रतिष्ठानच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लॉन टेनिस, बॅडमिंटन, अथलेटिक्स, बॉक्सिंग, फूटबॉल, बास्केट बॉल, स्केटिंग, कबड्डी,हॉकी आणि मल्लखांब या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. सर्व क्रीडा प्रकारांमध्ये अनेक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महापौरांनी खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच खेळासाठी त्यांचा उत्साह वाढविला.यावेळी मनोहर ढोरे, जवाहर ढोरे, माऊली जगताप, संतोष कांबळे,गणेश बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, शिवाजी निम्हण,गणेश काची,दत्ता कांबळे सर,युवराज कोळेकर आदी उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!