Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे शहरातील महापालिका दवाखान्यांचे खासगीकरण नाही : महापौर

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पुणे शहरातील महापालिका दवाखान्यांचे खासगीकरण करणार असल्याची अफवा पसरविण्यात आली होती ; परंतु शहरातील कोणत्याही महापालिका दवाखान्याचे खासगीकरण करण्यात येणार नाही , अशी ग्वाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव धायरी येथे लायगुडे दवाखान्यातील ऑक्सिजन बेडचे उद्घाटनप्रसंगी दिली . आ.भीमराव तापकीर यांच्या हस्ते या ऑक्सिजन बेडचे उद्घाटन करण्यात आले .

ते पुढे म्हणाले की , पुणे महानगर पालिकेच्या वतीने स्व . अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचे काम हाती घेण्यात आले असून , कॉलेज उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . येथे पन्नास बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून , तीस ऑक्सिजन बेड करण्यात आले आहेत . उद्घाटन प्रसंगी पाच ऑक्सिजन बेड त्वरित उपलब्ध करून देण्यात आले आहेत . आहेत . पुढील आठवड्यात तीस ऑक्सिजन
बेड सुरू करण्यात येणार आहेत .

Google Ad

हे ऑक्सिजन बेडचे काम नगरसेवक हरिदास चरवड यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले . या वेळी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे , आनंद रिठे , शंकर पवार , सिंहगड रोड प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी पोकळे , नगरसेविका राजश्री नवले , निता दांगट , माजी नगरसेवक बाळासाहेब नवले , दीपक नागपुरे , आरोग्य प्रमुख डॉ .
आशिष भारती , आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!