Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुणेकरांना नितीन गडकरींचे मोठे गिफ्ट … पुण्याच्या कात्रज चौकात होणारी वाहतूक कोंडी लवकरच संपुष्टात येणार आहे!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारने १६९.१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा उड्डाणपूल पुणे शहर, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्यात येईल .रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

गडकरी जे काम हातात घेतात ते पूर्णत्वास नेतात. कात्रज जंक्शनवर उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल 1,326 मीटर लांब आणि 24.20 मीटर रुंद असेल. पुणे-मुंबई बायपासवरुन सुरु होणारा हा उड्डाणपूल कात्रज-कोंढवा रोडवर उतरेल. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कात्रज-कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचे कामही हाती घेतले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!